

Underpass Work Delayed Despite Orders Issued Six Months Ago
Sakal
हडपसर : मगरपट्टा सिटी लगत असलेल्या जहांगीर नगर-कडवस्ती चौकातील डीपी रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या कामाचा आदेश निघून सहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही ठेकेदाराने काम सुरू केले नसून पालिका त्याला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. या चौकात होणाऱ्या दररोजच्या कोंडीने प्रवासी त्रस्त झाले असून रखडलेल्या कामामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.