
कडूस : दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहणारा कडूस (ता. खेड) येथील कुमंडला नदीवरील २.२६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा बंधारा यंदाच्या वर्षी जून महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात ओसंडून वाहू लागला आहे.