esakal | रशियात रंगला मराठी ‘काळ’!
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkumar Jarange

रशियात रंगला मराठी ‘काळ’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज - पुण्यात नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या राजकुमार जरांगेचा (Rajkumar Jarange) ‘काळ’ हा चित्रपट (Kal Movie) रशियातील (Russia) जवळपास ५० चित्रपटगृहात (Theater) प्रदर्शित झाला आहे. रशियन भाषेत (Russian Language) तो डब केला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील युवा कलावंत राजकुमारची भूमिका असलेला ‘काळ’ या चित्रपटाचे डी. संदीप यांनी दिग्दर्शन केले असून नितीन वैद्य, रंजीत ठाकूर आणि हेमंत रुपेरी यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे शूटिंग कलाकारांनीच केलेले आहे. (Kal Marathi Movie Release in Russia 50 Theaters)

जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या सिनेमात राजकुमार जरांगे सोबत सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयश बेहरे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघळीकर यांच्याही भूमिका आहेत. जरांगे हा औरंगाबादेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना नाट्यक्षेत्राकडे ओढला गेला. पुरषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धांत त्याने भाग घेऊन सुरुवातीला नाव केलं. द ट्री स्टोरी, वेत्रवतः, सुपारी, गिधाडे आणि गेल्या वर्षी भावकी या नाटकांतील भुमिकांबद्दल त्याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं. यापूर्वी त्याने ‘घुमा’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. त्यानंतर, २०१८मध्ये काळ हा सिनेमा मिळाला.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

पुण्याने माझ्या सारख्या पाषाणातल्या कोऱ्या चिऱ्याला आकार दिला आहे. कला क्षेत्र हे अस्थिर असून करमणूक क्षेत्र जीवनावश्यक नसले तरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आता रशियातील चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मोठा आनंद झाला आहे.

- राजकुमार जरांगे

असा झाला प्रवास

२०१६ला अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम मिळेल या अपेक्षेने राजकुमार पुण्यात आला. पण, ही अपेक्षा फोल ठरली. तसं काही झालं नाही मग महाविद्यालयात केलेल्या नाटकातील कामामुळे कला क्षेत्राशी आवड असल्याने सुदर्शन, भारत, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात आणि ललित कला केंद्रातली नाटकं सातत्याने पाहण्यास सुरवात केली. अतुल पेठे, सतीश आळेकर, अलोक राजवाडे आणि ललित कला केंद्र यांच्या नाटकांनी राजकुमारचा नाटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर श्रीकांत प्रभाकर, प्रदीप वैद्य यांच्याकडे फिजिकल थिएटर आणि नाटक या विषयावर कार्यशाळा केल्या.

loading image