‘काळेवाडी-औंध पूल खुला करा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पिंपरी - काळेवाडी-औंध मार्गावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेल्या दोन समांतर उड्डाण पुलांपैकी एकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुसऱ्या पुलाचेही काम प्रगतिपथावर आहे.

पिंपळे निलख येथील जगताप डेअरी चौकाजवळ प्राधिकरणाकडून मागील काही वर्षांपासून समांतर उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. त्यापैकी काळेवाडी-औंध मार्गावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. हा पूल खुला झाल्यास वाहनचालकांचा तीन किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. त्यामुळे उड्डाण पूल लवकरात लवकर खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अनिल सूर्यवंशी म्हणाले, ‘‘पूर्ण झालेला उड्डाण पूल खुला करण्याची तारीख अजून निश्‍चित झालेली नाही. आठवडाभरात ही तारीख निश्‍चित होणे अपेक्षित आहे. त्यानंतर उड्डाण पूल खुला होईल.’’

Web Title: Kalewadi Aundh Flyover