कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग

कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग
Published on: 

कल्याण पर्व रौप्यमहोत्सव;
महाराष्ट्र स्वागत समितीची निवड
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : कर्नाटकातील बसवकल्याण (जि. बिदर) येथे २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्र स्वागत समिती व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कुडलसंगम येथील बसव धर्मपीठाच्या श्री जगद्‌गुरू गंगादेवी माता आणि बसवकल्याण येथील अल्लमप्रभू शून्य पीठाधीश श्री जगद्‌गुरू सिद्धरामेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र स्वागत समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अमरनाथ सोलापुरे यांची नियुक्ती करण्यात आली. समन्वयक म्हणून विजयकुमार हत्तुरे, तर सहसमन्वयक म्हणून प्रा. भीमराव पाटील, प्रा. सुनील हेंगणे, सतीश पाटील, मल्लिकार्जुन तगारे आणि शरण सुशीलकुमार जिवणे यांची निवड झाली.
बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील बसवभक्तांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जनजागृती मोहीम, निवास व्यवस्था, महाप्रसाद, दासोह, स्वयंसेवक नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले.
रौप्य महोत्सवात देशभरातील संत-महंत, मठाधीश, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो बसवभक्त सहभागी होणार आहेत. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com