कल्याण रेल्वे यार्डात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार आरोपीला काही तासांत अटकv

कल्याण रेल्वे यार्डात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार आरोपीला काही तासांत अटकv
Published on

कल्याण रेल्वे यार्डात
१४ वर्षीय मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण रेल्वेस्थानक परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २३ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी (ता. १६) सायंकाळी घडली. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला काही तासांत अटक केली. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, सौरभ सोनवणे असे आरोपीचे नाव असून, पीडित मुलगी मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून कल्याण बसस्थानकात शनिवारी सायंकाळी आली होती. तिला खोपोलीला जायचे असल्याने ती कल्याण रेल्वेस्थानकात लोकलची वाट पाहत ती उभी होती. त्याच वेळी आरोपीने पीडित मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. तिने मोबाईल परत मागितल्यानंतर मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल, असे सांगितले. तेव्हा ती घाबरल्याने त्याच्यासोबत गेली. सौरभने तिला कल्याण रेल्वेयार्ड परिसरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडितेेने रेल्वे पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. जीआरपी आणि रेल्वे क्राईम ब्रँचने तातडीने तपास सुरू करीत सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पटवली आणि काही तासांत त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com