पुणे : कल्याणीनगर येथील ‘निद्रा बॉडी स्पा’वर (Nidra Body Spa) पोलिसांनी छापा मारून तेथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. युनिट-४ गुन्हे शाखा आणि येरवडा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. शनिवारी (ता. १७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.