garbage in river vadgaon sheri
sakal
वडगाव शेरी - कल्याणीनगर येथे नदीपात्रात हॉटेलचा ओला कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात फेकण्यात येत आहे. या प्रकारामुळे नदी आणि नाल्याचा गळा घोटला गेला असून हा कचरा फेकण्यात आरोग्य विभागाचे काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय स्थानिक पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला आहे.