

Kamala Nehru Hospital ICU free service Pune
sakal
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेकडून चालवण्यात येतो. या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार असून, रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी (बेड) ७ खाटा महानगरपालिका ताब्यात घेणार आहे. या ७ खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फेब्रुवारीअखेर ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.