

Kamla Nehru Hospital
Sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना पुरेसे वेतन मिळत नसल्याने ते रुजू होत नव्हते. मात्र, रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञ शाखेच्या डॉक्टरांना मासिक अडीच लाख वेतनवाढ महापालिकेने केली. येथे २५ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी १७ डॉक्टर बुधवारी (ता. १७) रुजू होणार आहेत.