

PMC Sanctions ₹13 Crore Plan for Upgrading Kamla Nehru Hospital
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची रुग्णसेवा ढासळत चालली असून, उपचार वेळेवर मिळत नसल्याने तेथील रुग्णांना ससून रुग्णालयात हलवावे लागत आहे. त्यामुळे ही गंभीर स्थिती सुधारण्यासाठी आरोग्यसेवेसह कर्मचारी, डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गरीब नागरिक येतात. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी हे रुग्णालय जोडले गेलेले असल्याने तेथे सर्व उपचार मिळावेत अशी अपेक्षा नागरिकांची असते. पण या रुग्णालयाची आजची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.