

Double Murder Solved in Kamshet: Pune Rural Police Arrest Two Suspects
मंचर : कामशेत (ता.मावळ) शहरांमध्ये रविवारी (ता.२९ मार्च) रोजी रोहिदास चव्हाण व आकाश दत्ता पिंगळे (दोघे रा. साई ता.मावळ ) यांच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या तपासणीनंतर आरोपी रणजीत रामचंद्र वाडेकर (वय ३६) व निखिल जितेंद्र माने (वय २८ दोघे रा.दौंड कॉलनी कामशेत ) यांना अटक केली आहे. जुन्या रागातून सदर घटना घडली आहे.