गृहमंत्र्यांनी केले कोरोना वाॅरिअर्सचे कौतुक

विवेक शिंदे
रविवार, 17 मे 2020

"कोरोना वॉरिअर्स' कानडे दांपत्य आपल्या लहान मुलाला घरी एकटं ठेवून कोविड- 19 च्या लढ्यात आपलं कर्तव्य बजावत आहेत.

une-news">पुणे) : कळंब (ता. आंबेगाव) येथील देवदत्त प्रभाकर कानडे मुंबई येथे पोलिस दलात काम करतात तर त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे केईएम रुग्णालयात गेले दोन महिन्यापासून मुंबई येथे कोरोना विरुद्ध कर्तव्य आपल्या लहान मुलाला घरी ठेवून पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक ट्विटर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे केले आहे. 

कोरोनामुळे झालाय असाही बदल...

 

धक्कादायक ! पुण्यात `या` ठिकाणी आढळला अनोळखी मृतदेह

पोलिस देवदत्त कानडे हे गेले दोन महिन्यापासून आपल्या जिवावर उदार होऊन दिवस रात्र सेवा देत आहे. त्यांच्या पत्नी सुवर्णा भगत- कानडे 2 फेब्रुवारी 2009 पासून केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. कोविड-19 तसेच नॉन कोविड- 19 या रुग्णांच्या रक्त तपासणी करण्याच्या लॅबमध्ये दिवसाला पाच ते सहा हजार रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करत आहेत. हे "कोरोना वॉरिअर्स' कानडे दांपत्य आपल्या लहान मुलाला घरी एकटं ठेवून कोविड- 19 च्या लढ्यात आपलं कर्तव्य बजावत आहेत. स्वतःचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा विचार न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:ला वाहून घेतलं आहे. आपल्या सुट्ट्या रद्द करून हे कर्मचारी कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. 

सोनं खातयं भाव; अहो ही तर, गुंतवणुकीची `सुवर्ण`संधी

पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहून आपलं काम करावं लागत आहे. घरी जाण्यासाठी वेळ मिळाला तरी, घरच्यांना स्वत:पासून दूरच ठेवावं लागत आहे. असाच एक भावनिक फोटो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्‌विटर अकाऊंटवरुन पोलिस नाईक या पदावर काम करणारे देवदत्त कानडे आणि केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे या पती-पत्नीचा फोटो शेअर करून कोरोना वॉरिअर्स म्हणून कौतुक केलंय. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोविड-19 च्या लढाईत वातावरण तणावविरहीत ठेवून आम्ही सर्वजण काम करत आहोत. सरकारच्या प्रयत्नांना जनतेने साथ देऊन आपण कोरोना विरुद्धची लढाई नक्की जिंकणारच आहे आणि कोरोनाला हरवणार आहे. महाराष्ट्रातील जनता प्रशासनास योग्य सहकार्य देत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोरोनाच्या संकटावर आपण नक्कीच मात करणार आहे, असे पोलिस नाईक देवदत्त कानडे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णा कानडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanade family fight with corona