

Kapil Kale Joins Shiv Sena in Presence of Eknath Shinde
Sakal
घोडेगाव : घोडेगाव (आंबेगाव) येथील स्वर्गीय माजी आमदार बी डी अण्णा काळे यांचे नातू कपिल दिलीप काळे यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.यामुळे घोडेगावात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना हा मोठा धक्का आहे.