

Short Circuit Triggers Fire in Karanjawihire
Sakal
आंबेठाण : करंजविहिरे ( ता.खेड ) येथील तळशेत येथे शॉर्ट सर्किटमुळे घरांना लागलेल्या आगीत घरासह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकमेकांना लागून तीन कौलारू घरे असल्याने या आगीची झळ तीनही घरांना बसली आहे.सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. तळशेत वस्ती येथे लक्ष्मी बाळू दिवेकर,मोहन महादू दिवेकर,विठ्ठल गजाबा कोळेकर यांची घरे एकमेकांना लागून आहेत.