esakal | कारगिलमध्ये धारतिर्थी पडलेल्या जवानांच्या पत्नीही आहेत ‘हीरो’
sakal

बोलून बातमी शोधा

kargil

कारगिलमध्ये धारतिर्थी पडलेल्या जवानांच्या पत्नीही आहेत ‘हीरो’

sakal_logo
By
अक्षता पवार, सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाच्या संरक्षणासाठी कारगिलच्या (kargil) युद्धात यश मिळवून देण्यासाठी लष्करातील जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र या वीर जवानांच्या मागे त्यांच्या वीर पत्नींनी घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मुलांच्या शिक्षणात अडचण येऊ नये याची काळजी घेतली. तर राज्यातील इतर वीरपत्नींना ही एकत्रित आणत त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत समाज कामात पुढाकार घेतला आहे. तसेच मुलांनाही देशसेवेचे धडे देत आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त अशा काही वीरपत्नींची गाथा. (kargil killed soldier wifes also hero)

नव्या घरात आले, मात्र तिरंग्यात :

घरात दोन लहान मुले आणि वृद्ध सासूबाई. आनंदात संसार होता आमचा. नवीन घर देखील बांधलं होतं. पण ते नव्या घरात आले थेट तिरंग्यात. ते शहीद झाल्याचे समजताच पाया खालची जमीनच सरकली. आर्थिक आधार नव्हता. नव्या घरासाठी काढलेलं कर्ज. त्यात परिवारात इतर कोणीही नव्हते. पण परिस्थितीशी सामना करण्याची ताकद होती म्हणून मुलांच्या शिक्षणातही अडचणी येऊ दिल्या नाही. अशी भावना व्यक्त केली शहीद लान्सनायक अंकुश दादाभाऊ जवक यांची पत्नी कल्पना यांनी.

कारगिल युद्धाच्या त्या आठवणी सांगताना कल्पना यांचे अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, ‘‘ते कारगिलमध्ये तैनात होते तेव्हा नवीन घराचे काम पूर्ण झाले होते. तेव्हाच सिमेवर युद्ध सुरू झाले आणि काही दिवसांत ते शहीद झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. लहान मुलं आणि सासूबाई यांची जबाबदारी मी एकटी कशी पार पाडणार हे समजत नव्हते. म्हणून माझे वडील आमच्या सोबत राहात होते. मात्र काही वर्षांनी सासूबाई आणि वडीलांचेही निधन झाले. तेव्हा मात्र माझा संपूर्ण आधार हरपल्यासारखं झालं. मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून मुलांना नगर येथील सैनिक वस्तीगृहात पुढील शिक्षणासाठी काही वर्षे ठेवले. आज माझा मुलगा ३१ वर्षाचा झाला असून तो नगर परिषदेत चांगली नोकरी करत असून एमपीएससीची ही तयारी करत आहे. मुलीचेही शिक्षण पूर्ण झाले असून तिचे लग्न झाले आहे.’’

हेही वाचा: पॅरोलवर असतानाच आरोपीने रचला आखाडे यांच्या खुनाचा कट

मुलाला पाहण्याची इच्छा राहिली अधूरी :

लग्नाला फक्त तीन वर्षे झाली होती... सर्व काही खुशाल होतं... आम्हाला एक मुलगा झाला... मुलगा पाच महिन्याचा झाला होता आणि यांचे पत्र आले की गोवर्धनला लवकर बघायला येतो... युद्धसीमेवर हालचाली सुरू झाल्या... ते आले नाही परंतू त्यांच्या शहिद झाल्याची बातमी आमच्या पर्यंत पोचली. तर मुलाला त्यांचा स्पर्श घेणे दूर आपल्या बाबाला साध पाहणं देखील आले नाही, अशी भावना व्यक्त केली कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या लान्सनायक एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा खैरनार यांनी.

हेही वाचा: पैलवान झाला बिझनेसमन; 'हेल्दी' व्यवसायाची अनोखी कहाणी

खैरनार कुटुंब हे मुळचे नाशिक येथील. तरुण वयातच पति देशसेवे दरम्यान शहीद झाले आणि कुशित लहानसे बाळ असतानाही रेखा यांनी स्वतःला सावरले. तर या साहसी कामगिरीबद्दल शहीद खैरनार यांना मरणोत्तर सेनापदक मिळाले. तसेच रेखा यांना केंद्र सरकारकडून एक पेट्रोल पंप मिळाला. यामुळे त्यांचे उत्पन्न सुरू झाले. आज त्यांच्या मुलगा गोवर्धन २२ वर्षांचा झाला आहे. तर त्याला ही पोलिस दलात जाऊन देशसेवेची परंपरा सुरू ठेवायची आहे.

सुरवातीचा काळ हा अत्यंत कठीम होता. मुलाची जबाबदारी कशी पार पाडायची याची मला दिवसरात्र चिंता होती. परंतु माझ्या वडीलांचा मला मोठा आधार माला मिळाला. समाजकार्यात मी सक्रिय झाले. माझा प्रमाणे इतर महिलाही असतील याची कल्पना आली आणि सर्व वीनपत्नींसाठी ‘त्रिदल वीरनारी संघटने’ची स्थापना केली. आज राज्यातील कित्येक वीरपत्नी या संघटनेशी संबंधीत आहेत. तसेच या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वीरपत्नींच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकारने देखील शहीद कुटुंबांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. आज कित्येक कुटुंबांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. असेही रेखा यांनी सांगितले

loading image
go to top