
सुपे - काऱ्हाटी (ता. बारामती) गावच्या सरपंच दिपाली लोणकर यांची प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्ली येथील संचलन कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निवड झाली आहे. येथील ग्रामस्थांनी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करून दुष्काळग्रस्त गाव ते आदर्श पाणीदार गाव अशी गावाची ओळख निर्माण केल्याने या कार्याची केंद्रीय स्तरावर दखल घेऊन लोणकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आल्याची माहिती पुण्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातून देण्यात आली.