

Dilip Walse Patil Clarifies Karjat Tree Felling Case Is Separate From Bhimashankar Wildlife Sanctuary in Pune Region
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे. दोन्ही ठिकाणांची भौगोलिक परिस्थिती आणि हद्द वेगळी असल्याने अपुऱ्या माहितीच्या आधारे अभयारण्याचे नाव वृक्षतोडीशी जोडू नये, असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.