esakal | कर्मयोगी कारखाना सभासदांचे आर्थिक हित जोपासण्यास कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षवर्धन पाटील

कर्मयोगी कारखाना सभासदांचे आर्थिक हित जोपासण्यास कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्या आदर्श शिकवणी प्रमाणे कारखाना चालत असून सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखरकारखाना पंचवार्षिक निवडणूकीतील बिनविरोध नुतन संचालक मंडळाचा जाहीर सत्कार समारंभ इंदापूर अर्बन बँक सभागृहात संपन्न झाला. भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, विविध संस्था, सभासद शेतकरी,गावपातळी वरील पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नुतन संचालक मंडळ तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी कारखान्याने अनेक संघर्ष, चढ-उतार पाहिले मात्र शंकरराव पाटील यांच्या विचारावरआम्ही सर्व जण ठाम आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पक्ष, संघटना, इच्छुक उमेदवार यांचा मी आभारी असून सभासद हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

पद्माताई भोसले म्हणाल्या, नुतन संचालक मंडळाने सभासद, कामगार,ऊस वाहतूकदार यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, राज्यातील अनेक कारखाने सद्य परिस्थितीत अडचणीतून मार्गक्रमण करत असून कर्मयोगीकारखान्याची निवडणूक ३५ वर्षानंतर बिनविरोध झाली आहे. आपण सर्वांनी कारखान्याच्या हितास प्राधान्य द्यावे.

यावेळी नवनिर्वाचित संचालक, नगरसेवक भरत शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, उपाध्यक्ष सत्यशील पाटील, ॲड.कृष्णाजी यादव,मारुतराव वणवे,बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माऊली चवरे, पांडुरंग शिंदे, सुरेश मेहेर, भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्षॲड. शरद जामदार तर सुत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.आभार नगरसेवक कैलास कदम यांनी मानले.

loading image
go to top