

कर्नाटकमध्ये
‘ईडी’चे छापे
नवी दिल्ली/बेंगळूर : कर्नाटकात २१०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासांतर्गत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आर्थिक व्यवहार, निधीचा अपहार, स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक आणि आरोपींशी संबंधित व्यक्ती व संस्थांशी केलेल्या व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती मंगळवारी ‘ईडी’ने दिली. बेळगाव, चिक्कोडी आणि निपाणी येथील शिवम असोसिएट्स, शिवानंद सिद्दप्पा नीलण्णावार आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
अमली पदार्थाचे
वैमानिकाकडून सेवन
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’प्रकरणी संबंधित वैमानिकाची अमली पदार्थांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत वैमानिकाने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. ‘एअर इंडिया’च्या फुकेत-दिल्ली या विमानाला हवेत जोरदार हादरे बसले होते. या घटनेत १७ जण जखमी झाले होते. या विमानात १३७ प्रवासी आणि आठ कर्मचारी असे १४५ जण होते.
आठवीतील मुलीवर
सामूहिक अत्याचार
बरेली : बरेलीतील नवाबगंज परिसरात आठवीतील विद्यार्थिनीवर उसाच्या शेतात सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विमलेश असे एका आरोपीचे नाव असून, दुसऱ्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मंगळवारी दिवसभर परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, आरोपी अद्याप फरारी आहेत. पोलिस अधीक्षक मुकेशचंद्र मिश्रा यांनी घटनेबाबत माहिती दिली.
भाजपच्या नेत्यावर
खंडणीप्रकरणी गुन्हा
श्रीनगर : कंत्राटदाराकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आणि त्याला धमकावल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी भाजपचे पुलवामा जिल्हाध्यक्ष शौकत गयूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. महंमद यासीन गनी याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सोमवारी रात्री पुलवामा येथील नेवा पोलिस चौकीत हा गुन्हा नोंदवण्यात आला. गयूर याने आपल्या मागण्या मान्य न केल्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कारवाई करण्याची धमकी दिल्याचेही गनी याने तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.