राज्यगीत गायनात हस्तक्षेप नाही

राज्यगीत गायनात हस्तक्षेप नाही
Published on

बंगळूर, ता. २८ : कर्नाटकाचे नाडगीत (राज्यगीत) ‘जय भारत जननीय तनुजाते’च्या गायनासाठी विशिष्ट लय आणि कालावधी निश्चित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला दुजोरा देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
नाडगीतासाठी म्हैसूर अनंतस्वामी यांनी दिलेली लय स्वीकारून संपूर्ण गीत गायले जावे, तसेच कोणताही आलाप किंवा पुनरावृत्ती न करता ते दोन मिनिटे ३० सेकंदांच्या कालावधीत सादर केले जावे, असा राज्य सरकारचा आदेश होता. हा आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर किक्केरी कृष्णमूर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
न्या. बी. व्ही. नागरत्न आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. लय आणि गायनाचा कालावधी या दोन्ही बाबतीत एकरूपता असणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
कृष्णमूर्ती यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मोहन व्ही. कातारकी यांनी युक्तिवाद केला. मात्र, तज्ज्ञांनी संकलित केलेल्या नाडगीतासाठी विशिष्ट लय निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले होते. सरकारच्या या निर्णयामुळे याचिकाकर्त्याच्या कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा देखील न्यायालयाने फेटाळून लावला होता.

युक्तिवाद अमान्य
यापूर्वी, नाडगीत कोणत्या रागात किंवा लयीत गायले जावे, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असा कृष्णमूर्ती यांचा युक्तिवादही कर्नाटक उच्च न्यायालयाने अमान्य केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com