Pune Traffic Update
esakal
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक यात्रेनिमित्त संत नामदेव महाराज यांच्यासह इतर पालख्यांचे शहरात आगमन झाले आहे. या पालख्यांचे बुधवारी (ता. १२) सकाळी आळंदीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून पालखी मार्गावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.