कार्तिकी वारीमुळे आळंदीत वाहनांना उद्यापासून बंदी

मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
Alandi Roads
Alandi RoadsSakal
Updated on
Summary

मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता अन्य वाहनांना गुरुवार (ता. १७) ते बुधवार (ता. २३) या कालावधीत आळंदी आणि परिसरात प्रवेशबंदी केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

चाकणकडून (आळंदी फाटा) येणारी वाहने आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटलजवळील आळंदी फाटा हनुमानवाडी येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे.

मॅगझीन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पुण्याहून येणारी वाहने दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा.

मरकळ रस्त्यावरील वाहनांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा. धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गाने चऱ्होली बुद्रुक मार्गे वाहने पुणे येथे जातील. मरकळ औद्योगिक वाहतूक कोयाळी वडगाव घेनंद शेलगाव फाटा चाकण या मार्गाचा वापर करावा.

अवजड वाहनांना हेही रस्ते बंद

  • मोशीतील गावठाण चौक आणि भारतमाता चौक येथून येण्यास बंदी

  • नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा चौकातून चिंबळी गावठाण मार्गे रस्ता बंद

  • देहूरोड येथील देहू कमानीतून देहूगावाकडे जाण्यास बंदी

  • तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा येथून देहूगावाकडे जाण्यास बंदी

  • निघोजे-महाळुंगे येथून महिंद्रा सर्कलकडून तळवडे आयटी पार्ककडे जाणारा रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com