Karuna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kruna Munde

Karuna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...'

Karuna Munde On Dasara Melava : एकीकडे शिवाजी पार्कवर आगामी दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसताना आता या वादात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनीदेखील उडी घेतली आहे. त्या पुण्यातील घोरपडी येथे आयेजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

हेही वाचा: Bengaluru : रूग्णासाठी वाहतूक कोंडीत अडकलेला डॉक्टर 45 मिनिटं धावला अन्...

करूणा मुंडे म्हणाल्या की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझं नाव घेताच लोक घाबरतात असेही करूणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाल्या?

यावेळी बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहेत. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क आणि भगवानगडावर होतो हे माहिती होतं मात्र त्याच्याशिवाय कुठेच होत नाही हे मात्र माहिती नव्हतं. मी वंजारी समाजाची आणि मुंडे परिवाराची सून असून, मीपण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: Nitin Gadkari : पटोलेंच्या ऑफरवर गडकरींचं स्पष्टीकरण; म्हणाले,''मी...''

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनात आता मी पण रेसमध्ये 110 टक्के शर्यतीत उतरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दसरा मेळाव्यासाठी मी स्वतः नामदेव शास्त्री यांच्याकडे जाऊन यासंबंधी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही करूणा यांनी यावेळी सांगितले. मी एका मंत्र्याची बायको असून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचल्याचेही यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या.

Web Title: Karuna Munde Dhananjay Munde Eknath Shinde Uddhav Thackeray Dasara Melava Bhagwangad Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..