Illegal Banners Overtake Karve Nagar Bus Stops : कर्वेनगर (प्रभाग ३०) येथील बसथांब्यांच्या शेडवर महापालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ 'चमकोगिरीसाठी' अनधिकृत फलक लावल्यामुळे परिसर विद्रूप झाला असून, यामुळे महापालिकेच्या महसुलाचेही नुकसान होत आहे.
कर्वेनगर : परिसरातील प्रभाग क्रमांक ३० येथील बसथाब्यांना सध्या अनधिकृत फलकांनी वेढले आहे. महापालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ चमकोगिरीसाठी लावलेल्या या फलकांमुळे परिसर विद्रूप झाला आहे.