Karvenagar: महापालिकेच्या निष्क्रियतेचा नागरिकांना त्रास; कर्वेनगर परिसरात अनेक दिवसांपासून बंद पथदिव्यांमुळे प्रवास असुरक्षित
Municipal inaction: कर्वेनगर परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांचा रात्रीचा प्रवास धोकादायक झाला आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना अपघाताचा धोका, अंधारात गैरसोय आणि सुरक्षा चिंतेचा सामना करावा लागत आहे.
कर्वेनगर : मावळे आळी, गोसावी वस्ती, कामना वसाहत, वनदेवी मंदिर जवळील वस्तीभागातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला असतो.