esakal | कर्वेनगर: 'ई-लर्निंग' स्कुलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

कर्वेनगर: 'ई-लर्निंग' स्कुलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
महादेव पवार

वारजे: अनेक नगरसेवक आपल्या कुंटूंबातील नावे अनेक बोर्डाना देतात. कदाचित त्यांनी मोठे काम केले असावे. याबाबत मला काही म्हणायचे नाही. मात्र अनेकजण असे करतात. मात्र लक्ष्मी दुधाने यांनी अत्यंत हुशार, साधेपणा व सु-संस्कृत व्यक्तिमत्व असणारे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr.APJ Kalam) यांचे नाव देऊन शाळेचे महत्व वाढविले आहे. असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्वेनगर येथे केले.

हेही वाचा: Pune : पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्यांना अटक

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या निधीतून साकारलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूलच्या उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले की, डॉ.कलाम आणि माझा चांगला संबंध होता. या माणसाला कशाचेही व्यसन नव्हते. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. त्यांनी निर्माण केलेली आयुधेचीच नावे शाळेच्या खोल्याना दिली आहेत. हे चांगले काम आहे.

यामधूनच मुले पुढे जातील. या देशामध्ये आयटीच्या माध्यमातून नवीन धोरणे स्वीकारली जात आहेत. संपूर्ण देशात आयटीसाठी पुणे, हैद्राबाद, बंगळुरु या तीन शहरांचीच नावे घेतली जातात. नव्या पिढीला विज्ञानाच्या माध्यमातून जगाला घडविण्याची क्षमता पुण्यामध्ये आहे. त्याचाच विचार करून हे नाव दिले असावे. वाराणसी येथे कलामाणी एक पत्र लिहिले आहे. तेथे गेल्यावर ते जरूर वाचा.

हेही वाचा: इंदापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : मंत्री दत्तात्रय भरणे

यामध्ये राजकारणी व वैधनिक यांचे नाते कसे असावे ते सांगितले आहे. असेही पवार म्हणाले. यावेळी खासदार चव्हाण म्हणाल्या की, ही शाळा आपल्या महापालिकेच्या शाळेपेक्षा वेगळी आहे. यावेळी खासदार वंदना चव्हाण, रुपाली चाकणकर, प्रशांत जगताप, अंकुश काकडे, आयुक्त विक्रम कुमार, आमदार चेतन तुपे, अंकुश काकडे, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, दीपक मानकर, स्वप्नील दुधाने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, मीनाक्षी राऊत, प्रशांत जगताप, आयुक्त विक्रम कुमार, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, बाबुराव चांदेरे, स्वप्नील दुधाने, प्रशांत वाघमारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी उपस्तित होते.

नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी उपस्थिताचे स्वागत केले. तर स्वप्नील दुधाने यांनी प्रास्ताविक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

loading image
go to top