
Warje Encroachment
Sakal
कर्वेनगर/वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून हद्दीतील पदपथ, रस्ता, फ्रंट व साइड मार्जिनमध्ये झालेल्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करत तब्बल १३,४७५ स्के.फूट कच्चे-पक्के बांधकाम पाडले. ही कारवाई समर्थपथ, डीपी रस्ता, गुलाबराव ताठे पथ, आंबेडकर चौक ते वारजे हायवे पूल या परिसरात करण्यात आली.