
कर्वेनगर : कोथरूड येथील गणंजय सोसायटीजवळ बधाई चौकात महापालिकेकडून भारतीय जवानाचे शौर्यशिल्प उभारले होते. यामुळे चौकातील सौंदर्यात मोठी भर पडली होती. आता मात्र त्याची दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.