
कर्वेनगर : शहरात गुरुवारी (ता. १९) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून, या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्त्यावर पाण्याचे तळे साचले असून ‘रस्ता पाण्यात का पाणी रस्त्यात’, अशा शंका नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. या पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.