Kasaba ByPoll : मुक्ता टिळकांच्या मुलाला उमेदवारी साठी पैसे मागितले? धमकीच्या फोनमुळे कसब्यात खळबळ

Mukta Tilak Kunal Tilak
Mukta Tilak Kunal TilakSakal

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातल्या कसबा मतदारसंघातली एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसाठी आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, तिकीट मिळवण्यासाठी मुक्ता टिळक यांच्या मुलाला धमकीचा फोन आला आहे.

कुणाल टिळक हे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत. "तुमचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तिकीट निश्चित केल्याचे" सांगत केला फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिकीट निश्चित झालं असल्याने पक्षासाठी पैसे पाठवा अशी मागणी या फोनद्वारे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कसबा विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यात भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांचे नाव देखील चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी कुणाल टिळक यांना एका अनोळखी इसमाने मोबाईल वर फोन करून "मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बोलतो आहे" असं सांगितलं. या नंतर त्या अनोळखी इसमाने कुणाल यांना "तुमचे आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झाले आहे" असंही सांगितलं. तिकीट निश्चित झाल्यामुळे आम्हाला ७६ हजार रुपये पाठवा अशी मागणी या फोनद्वारे करण्यात आली आहे.

मात्र कुणाल यांनी या व्यक्तीला कुठलीच दाद दिली नाही आणि हा सगळा प्रकार त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पक्षाला कळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com