

Fatal Accident at Kasari Phata as Container Rams Pickup
Sakal
तळेगाव ढमढेरे : पुणे - अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा (ता. शिरूर) येथील चौकात फुले घेऊन पुण्याकडे चाललेल्या पिकअपला पाठीमागून कंटेनरने जोरात धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक महिला ठार झाली असून, तिघेजण जखमी झाले आहेत. यासंदर्भात पिकअप चालक तेजस विलास पंदरकर रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.