Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

गणेशोत्सवात अखंडित वीजपुरवठ्यासाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; तांत्रिक कारणांवर वेळेवर माहिती व तातडीने वीज सुरळीत करण्याची मागणी
Kasari villagers seek uninterrupted power supply during Ganeshotsav.

Kasari villagers seek uninterrupted power supply during Ganeshotsav.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : कासारी (ता. शिरूर) येथे ऐन गणेशोत्सव काळात रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आज गुरुवारी तळेगाव ढमढेरे येथील महावितरण कार्यालयात अखंडित वीज मिळण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर साकडे घातले आहे. यावेळी अखंडित वीज मिळण्यासाठी ग्रामस्थांच्या स्वाक्षरींचे निवेदन कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा यांच्याकडे दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com