
Kasba By Election Result: १५ वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न...विजयानंतर धंगेकरांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
Kasba By Election Result: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.
धंगेकर यांच्या विजयानंतर पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (kasba by election Pratibha Dhangekar reaction after ravindra dhangekar win)
धंगेकर यांच्या विजयामुळे खुप आनंद झाला आहे. येवढ्या वर्षाची जी ३० वर्षाची मेहनत आहे त्याचं फळ मिळालं. मविआने आणि कसब्यातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे.
१५ वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं आहे. कसबा हा मविआचाच होता. हा कधी भाजपचा नव्हाता. त्यांनी इथे फुगवलेला फुगा होत. जो आता फुटला आहे. पत्नी म्हणून मी त्यांना नेहमी साथ दिली आहे.
आम्ही दोघे प्रचारदरम्यान खुप कमी वेळ एकमेकांना भेटत होतो. कसब्याचा विकास भविष्यात चांगलाच होईल. भाजपच्या काळात जी काम रखडलेली होती ती पुर्ण करणार. अशी ग्वाहीही धंगेकरांच्या पत्नीने दिली.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आली.