Kasba Byelection : कसब्यात पुणेरी पाट्यांनी वातावरण तापवणारा रंगेहात सापडला; भाजप म्हणते… | Puneri Patya in Kasba Peth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Byelection man caught putting puneri patya in kasba peth BJP accuses Congress leaders

Kasba Byelection : कसब्यात पुणेरी पाट्यांनी वातावरण तापवणारा रंगेहात सापडला; भाजप म्हणते…

Puneri Patya in Kasba Peth Byelection News : पुण्यात कसबा-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यां दोन्ही गटांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावला जात आहे.

येत्या २६ फेब्रुवारीला दोन्ही मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी यापूर्वी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे. शरद पवारांपासून ते आदित्य ठाकरे पर्यंत सर्व नेत्यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

दरम्यान पुण्यात निवडणूक असल्यामुळे पुणेरी पाट्या, पुणेरी टोमण्यांनाचा उल्लेख होणार नाही तर नवलच. नुकतेच कसब्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाणा साधणाऱ्या पुणेरी पाट्या झळकल्या होत्या. या पाट्या नेमक्या कोणी लावल्या यावरून राजकीय चर्चेला उधाण आले .

रात्री अडीच वाजता लावत होता पाट्या

निवडणूकीच्या रणधूमाळीत या पुणेरी पाट्या नेमक्या कोणी लावल्या याची चर्चा राजकीय फडात रंगू लागली होती. यादरम्यान भाजपकडून हे कृत्य काँग्रेस नेत्याने केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुण्यात रात्री २.३० वाजता चोरून चौका चौकात तसेच आपल्या सोसायटी मध्ये पाट्या लावत असताना एकाला पकडण्यात आलं आहे. हा काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल जाधव असून पुणे मनपामध्ये शिक्षण मंडळात काम करत असून यासोबत आणखी दोन सहकारी होते, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

पाट्यांवर काय लिहीलंय?

"कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लागतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलेही आमिष दाखवू नयेत" #यंदाकसब्यातधंगेकरच

"येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!" #यंदाकसब्यातधंगेकरच, असा उल्लेख या पाट्यांवर करण्यात आला आहे.

टॅग्स :Pune News