
Kasba Bypoll: भाजपचं ठरलं पण कॉंग्रेसचा घोळ मिटेना, धंगेकरांच्या उमेदवारीवर अजूनही संभ्रम कायम
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
दरम्यान काँग्रेसकडून माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली अशी अफवा आज पसरवण्यात आली होती. मात्र अजून पर्यंत कोणाची ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
अशी माहिती कसबा विधानसभा मतदारसंघ निरीक्षक संग्राम थोपटे यांनी दिली आहे. थोपटे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या क्षणापर्यंत कुणाच्याही नावाची घोषणा अजून पर्यंत झाली नाही, उद्या उशिरापर्यंत त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीचे अन्य नेते याबाबत निर्णय घेतील, आणि उमेदवारी उद्याच जाहीर होईल. या पोटनिवडणुकीत निरीक्षक म्हणून माझी जबाबदारी होती त्यानुसार मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. अशी प्रतिक्रिया संग्राम थोपटे यांनी दिली.