Kasba Bypoll Election : कसबा पेठ मतदार संघात १० हजार वाहनांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election 2023 Inspection of 10 thousand vehicles in Kasba Peth constituency politics pune

Kasba Bypoll Election : कसबा पेठ मतदार संघात १० हजार वाहनांची तपासणी

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक व नाका तपासणी पथकांमार्फत आतापर्यंत १० हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनामार्फत मतदारसंघात ९ तपासणी नाके आणि ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत मतदारसंघात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच, भरारी पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

पोलिस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य मिळत आहे. आतापर्यंत भरारी पथकांमार्फत व नाका तपासणीमध्ये १० लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर, १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली.