Kasba Bypoll : मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची धंगेकरांना रसद! राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray
Raj Thackeray

पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपने कसब्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शिवाय भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र पुण्यात पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहे.

Raj Thackeray
घाबरले नाही! ;युपी में का बा', गाण्यावरून नोटीस आल्यानंतर नेहा सिंह राठोडची प्रतिक्रिया

पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती, विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. आज बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत पुण्याच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मदत होणार नाही, याची काळजी घ्या, जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा. मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही, मात्र मनसेची 100 टक्के मदत ही भाजपला व्हायला हवी अशा सूचना नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Raj Thackeray
Shiv Sena : सुप्रीम कोर्टाने दिलेली 'जैसे थे' स्थिती म्हणजे काय? ठाकरे गटाला असं मिळेल संरक्षण

कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे मात्र या निवडणुकीत राज ठाकरेंच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या वतीने एक पत्र प्रसिद्धीला दिलं आहे. त्यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे हे पक्षविरोधी काम करताना आढळून आले आहेत. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने हे पत्र काढण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com