Kasba-Chichwad By Election : पोटनिवडणुकीसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक मैदानात

स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kasba-Chichwad By Election bjp 40 Star campaigner list announced  gadakari fadanvis bawankule rane politics
Kasba-Chichwad By Election bjp 40 Star campaigner list announced gadakari fadanvis bawankule rane politicssakal

पिंपरी : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय समितीने तब्बल चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी भाजपतर्फे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करण्यात आले होते.

मात्र, निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करून घेण्यात आला आहे.

गडकरी, राणे, फडणवीसांचा समावेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,

विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक,

आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीस जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com