
मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रतिक्रिया समोर आलीये.
Political News : मनसेचा चिंचवड, कसब्यात भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादी म्हणते, बोलघेवडे पोपट ED च्या..
Kasba Chinchwad By Election : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेनं आपली भूमिका जाहीर केलीये.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेनं (MNS) तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र, आता मनसेनं आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं.
दरम्यान, मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रतिक्रिया समोर आलीये. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी मनसेवर केलीये.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत, असं ट्विट करत राज ठाकरेंवरही (Raj Thackeray) त्यांनी हल्लाबोल केला. जगताप यांच्या या ट्विटमुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कालच (मंगळवार) मनसेनं कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.