Pune Bypoll Results: गुलाल कोणाचा! कसबा-चिंचवड पोटनिवणुकीची आज मतमोजणी; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कसबा-चिंचवडची पोटनिवणुकीत कोण मारणार बाजी?
Pune Bypoll Results
Pune Bypoll ResultsEsakal

चुरशीची बनलेल्या पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपकडून मोठी ताकद प्रचारासाठी लावण्यात आली होती.

तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागलेलं आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार करण्यात आला आहे.

स्ट्रेलिमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. यामध्ये भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं होतं. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मतांनी विजयी होतील असं सांगितलं आहे.

Pune Bypoll Results
काँग्रेसला माने, कोठे, शिंदे, शेख, खरटमल, चंदेले, बेरियांनी सोडले! पण, शिंदेंनी कोणालाच नाही जोडले

तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pune Bypoll Results
SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा

मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

तर चिंचवडमध्येही सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार असून यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com