

Kasba Ganapati Temple Closed
ESakal
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, दि.१५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी दिली.