Ravindra Dhangekar : आमदार झालात, आता खासदार व्हा ! ; धंगेकर यांच्याबाबत कसबावासीयांनी व्यक्त केल्या भावना

‘‘कसबा जिंकून आमदार झालात, आता खासदार होऊन पुण्याच्या विकासाचे प्रश्न सोडवा, त्यासाठी आमचे आशीर्वाद तुम्हाला आहेत,’’ अशा भावना महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत कसबावासीयांनी व्यक्त केल्या.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsakal

पुणे : ‘‘कसबा जिंकून आमदार झालात, आता खासदार होऊन पुण्याच्या विकासाचे प्रश्न सोडवा, त्यासाठी आमचे आशीर्वाद तुम्हाला आहेत,’’ अशा भावना महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत कसबावासीयांनी व्यक्त केल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १५ व २९ परिसरात झालेल्या पदयात्रेत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत होते. ही पदयात्रा अखिल मंडई मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती करून सुरू झाली. महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास धंगेकर यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. मंडई मंडळापासून सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा बदामी हौद, शिंदे आळी, काळा हौद, व्हाइट हाऊस, सुभाषनगर, विश्व हॉटेल, लोकमान्यनगर, अशोक विद्यालय, गांजवे चौक, राजेंद्रनगर, दत्तवाडी चौक, अरुण धिमधिमे यांच्या ऑफिसवरून शास्त्री पुतळा येथे समाप्त झाली.

पदयात्रेदरम्यान अनेक मंदिरांमध्ये धंगेकरांनी दर्शन घेतले; तसेच गणेश मंडळांना भेटी देऊन आरती केली. ‘आपल्याला सांगितलेले काम पूर्ण झाले’, असे सांगत अनेक नागरिक धंगेकर यांना धन्यवाद देत होते. यावेळी अभिजित बारावकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‍घाटनही करण्यात आले. 

Ravindra Dhangekar
Murlidhar Mohol : पीएमपीचा प्रवास आनंददायी करणार ; मोहोळ यांची ग्वाही,५०० सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू

याप्रसंगी अंकुश काकडे, अण्णा थोरात, अश्विनी कदम, अभिजित बारावकर, बाळासाहेब गरुड, बाळासाहेब अमराळे, बाळासाहेब मारणे, बुवा नलावडे, अक्षय माने, गणेश नलावडे, सुधीर काळे, बंडू शेडगे, प्रवीण करपे, मच्छिंद्र उत्तेकर, संदीप गायकवाड, शुभम लाड, वैजयंती घोडके, प्रशांत गांधी, संतोष जोशी, सोनाली जाधव, भोला वांजळे, शिवराज भोकरे, मदन कोठुळे, दीपक पोकळे, रोहन पायगुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कसबा मतदारसंघ अतिशय दाट वस्तीचा असून, येथे विकास प्रकल्प राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दिलेल्या मुदतीत दूर करतो. नागरिकांचे प्रश्न सोडविल्यावर त्यांना आवर्जून कळवतो, मात्र अजून खूप टप्पा गाठायचा आहे. आंबिल ओढ्याला पावसाळ्यात मोठा पूर येतो व नागरिकांचे नुकसान होते, हा पुराचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यावर मी भर देणार आहे.

- रवींद्र धंगेकर, उमेदवार, महाविकास आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com