Murlidhar Mohol
Murlidhar Moholsakal

Murlidhar Mohol : पीएमपीचा प्रवास आनंददायी करणार ; मोहोळ यांची ग्वाही,५०० सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू

जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Published on

पुणे : जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाइट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात मोहोळ यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. यात आमदार सुनील कांबळे, बाबू वागस्कर, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर, मकरंद केदारी, दिनेश होले, सागर गव्हाणे, कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, तात्या शेंडकर, मारुती भद्रावती, नीलेश अशोक कांबळे, दिलीप जांभूळकर, प्रसाद चौघुले, मनोज चोरडिया, निशा कोटा, अतुल वानवडीकर, दिनेश सामल सहभागी झाले होते.

Murlidhar Mohol
Loksabha Election Voting : मतदानासाठी उद्या कामगारांना पगारी सुट्टी

मोहोळ म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या ‘फेम २’ योजनेंतर्गत १५० ई-बसेस मिळाल्या आहेत.

अपेक्षित ६५० ई-बसेसपैकी ४७३ बसेसचा वापर सुरू झाला असून, उर्वरित बसेस लवकरच येतील. शहराच्या चारही दिशांना सहा ई-बस चार्जिंग डेपो कार्यान्वित केले आहेत. ५०० सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात ७० टक्के तर कार्बन उत्सर्जनात ५० टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com