esakal | नीलिमा बोरवणकर यांना "कथादीप' पुरस्कार प्रदान 
sakal

बोलून बातमी शोधा

neelama-borwankar

साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने कथालेखिका नीलिमा बोरवणकर यांना "कथादीप' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नीलिमा बोरवणकर यांना "कथादीप' पुरस्कार प्रदान 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने कथालेखिका नीलिमा बोरवणकर यांना "कथादीप' पुरस्कार प्रदान करण्यात आला. डेक्कन येथील सावरकर भवन येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सदा डुंबरे आणि राजन खान उपस्थित होते. त्यांच्या सोबत साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष तडवळकर व्यासपीठावर होते. या कार्यक्रमास कवी विजय शेंडगे, प्रतिभा पवार, सुनीती लिमये, प्राजक्ता पटवर्धन, निरुपम महाजन आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खान म्हणाले, ""लेखकाने आधी अनुभवसंपन्न व्हावे आणि मग लेखनास हात घालावा, असे माझे मत आहे. बहुतेक लेखकांचे लेखन हे आत्मकथन स्वरूपाचे असते. त्यामुळे त्यांचे लेखन एका विशिष्ट परिघाच्या पलीकडे जात नाही. त्यामुळेच लेखकांनी जे आपल्या जगण्याचा भाग नाही, त्याचा शोध घेऊन लिहिले पाहिजे. दुसऱ्याच्या जगण्याशी भिडले पाहिजे. बरेच लेखक दुसऱ्याच्या जातीविषयी लिहिताना बऱ्याचदा हिणकस लिहितात, हे टाळले पाहिजे.'' 

डुंबरे म्हणाले, ""लेखकाने कल्पित वास्तवाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक जगणे अनुभवण्याचा प्रवास करताना त्या थकत नाहीत. जगणे महत्त्वाचे, लेखन हे बायप्रॉडक्‍ट आहे, याचे भान लेखकांनी ठेवायला हवे.''

loading image