
कात्रज : कात्रज चौक येथे आज (ता.१५) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव मोहम्मद इक्बाल पठाण (वय २८ वर्षे, रा. राजस सोसायटी, कात्रज चौक) असे आहे.