कात्रज चौक घेणार मोकळा श्वास; नितीन गडकरी

Katraj Chowk traffic issue will be resolved soo said Gadkari
Katraj Chowk traffic issue will be resolved soo said Gadkari

खडकवासला : वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाकडून बाह्यवळण सहापदरी रस्त्याने येणारी व कोंढाव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडर सिटी येथून उड्डाणपूलावरून राजस सोसायटीच्या पुढे जाणार आहे. परिणामी कात्रज येथील हायवे चौक व राजस सोसायटी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढल्या असून पुढील दोन महिन्यात याचे काम सुरू होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

दरम्यान, आजच्या पुणे भेटीत त्यांनी शहर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेतला. दरम्यान हा पूल महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून जात आहे. त्यासाठीच्या कामाला महापालिकेने देखील परवानगी दिलेली आहे. हा पूल सहा पदरी असून यासाठी एक हजार 326 मीटर त्याची लांब आहे. त्यासाठी 169 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी या कामाची निविदा काढली आहे. सहापदरी उड्डाणपूलाच्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. म्हणजे मार्च 2023 ला हा उड्डाणपूल वाहतुकीला खुला होईल असा दावा गडकरी यांनी यावेळी केला. 

उड्डाणपूल काही खांब पालिकेच्या प्राणि संग्रहालयाच्या हद्दीतून जाणार आहे. म्हणून या उड्डाणपुलावरील वाहनांचा, वाहतुकीचा त्रास येथील वन्यजीव प्राण्यांना होऊ नये. यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे.या उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यावर दहा फुटाचे सॉलिड बोर्ड उभारले जाणार आहेत. या पुलावरील वाहनांचा आवाज आजूबाजूला न जाता तो उंच आकाशाच्या दिशेने जाईल. त्यामुळे वाहनांच्या आवाज येथील वन्यप्राण्यांना होणार नाही. या उड्डाणपुलाचे काम मेट्रोच्या धर्तीवर होणार आहे. परिणामी काम सुरू असताना त्याचा चौकातील वाहतुकीला अडथळा येणार नाही. पूल झाल्यावर कात्रज बोगद्यातून येणारी वाहने उड्डाणपुलाखालून भारती विद्यापीठाकडे जाणार आहेत. या उड्डाणपुलाला सेवा रस्ते देखील असणार आहेत. कात्रज महामार्ग चौक, राजस सोसायटी परिसरातील चौक असे दोन्ही चौक ओलांडून उड्डाणपूल जाणार असल्यामुळे कात्रज परिसरातील मोठी वाहतूक कोंडी सुटणार आहे. असे ही गडकरी यांनी स्पष्ट केले. 

नवले पूल ते कात्रज मे अखेर पूर्ण होणार 

वडगाव नवले पूल ते कात्रज हा बाह्यवळण महामार्ग सध्या चार पदरी आहे. तो सहा पदरी करणार आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन पदरी सेवा रस्ते असणार आहेत. याचा ही आढावा गडकरी यांनी घेतला. हा पूल मे महिन्यापर्यंत पूर्ण करायचा आहे त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सध्या आंबेगाव येथील खिंड फोडण्याचे काम जोरात सुरू आहे. या ठिकाणी दोन भुयारी मार्ग करण्याबाबतचा निर्णय आहे. आमदार भीमराव तापकीर व पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे नियोजन केले आहे. या रस्त्याच्या कामाला 73 कोटीची खर्च अपेक्षित आहे. सध्या 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com