
Katraj Dairy
Sakal
पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज येथील मुख्यालयावर डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे संघाची दूध प्रक्रिया क्षमता दुप्पट होऊन, तीन लाख लिटरपर्यंत पोहोचणार आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.