

कात्रज : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील वाढत्या भेसळीबाबत चिंता व्यक्त करत, ग्राहकांना शुद्ध दूध पुरवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी केले. या वेळी संचालक सागर फडके, कामगार संघटना इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव मोडक उपस्थित होते. चांभारे म्हणाले, ‘‘दूध भेसळीविरोधातील कारवाईमुळे शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण होत आहे. कुटुंबातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी सर्व दूध उत्पादक संस्थांनी भेसळमुक्त दुधाचा पुरवठा करावा.’’ संघाची वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोडक यांनी सांगितले. कुमार मारणे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.