कात्रज डेअरी उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया फरकाची रक्कम देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Katraj Dairy

पुणे जिल्हा दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ४६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.

कात्रज डेअरी उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया फरकाची रक्कम देणार

पुणे - पुणे जिल्हा दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ४६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी संघास दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दर फरकाची रक्कम देण्यात येणार असून, त्यासाठी ८.६३ कोटी रुपये लागतील, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २०) पार पडली. दूध संघाच्या अध्यक्षा केशर पवार यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पवार म्हणाल्या, गतवर्षी दूध दर फरकापोटी उत्पादकांना ७.९० कोटी रुपये दिले होते. यावर्षी दूध दर फरकापोटी ८.६३ कोटी देण्यात येणार आहेत. दूध संस्थांनी संघास पुरविलेल्या दुधाची रक्कम मिळण्यास साधारण २० दिवस लागतात, हा कालावधी कमी करण्यात येईल.

जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी रोगाबाबत सदस्यांनी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर संघामार्फत लसीकरण चालू असून, येत्या आठवड्याभरात लसीकरण पूर्ण होईल. सर्व जनावरांचा सरकारमार्फत विमा उतरविण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांना सन्मानचिन्ह आणि ११ हजार रुपये देवून या वेळी गौरविण्यात आले. संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी आभार मानले. प्रारंभी प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आदर्श सहकारी दूध उत्पादक संस्थांची नावे -

वनारीनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था (बेंढारवाडी, ता. आंबेगाव), हुतात्मा राजगुरु (राजगुरुनगर, ता. खेड), अमृतेश्वर (चिखलगांव, ता. खेड), शिवम (मुखई, ता. शिरुर), फुलाई (आरणगाव, ता. शिरुर), पंचवटी (शिंदेवस्ती राक्षेवाडी, ता. शिरुर), सोमनाथ (केडगांव, ता. दौंड), श्रीराम (निमगावसावा, ता. जुन्नर), कुलस्वामी (धामणखेल, ता. जुन्नर), जखणीमाता (अंत्रोली, ता. वेल्हा), कानिफनाथ (वडकी, ता. हवेली), महादेव (कोंढावळे, ता. मुळशी), उरवडे आंबेगाव (उरवडे, ता. मुळशी), जय मल्हार (नानोली, ता. मावळ), गणेश (रानमळा, धालेवाडी), मळाईदेवी(पांगारी, ता. भोर).

Web Title: Katraj Dairy Will Pay Difference Of Rupees 1 Per Liter To The Dairy Producers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :moneykatraj